नामविस्तार दिन: छ. संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल, वर्दळीचा रस्ता बंद, पर्यायी मार्ग
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: दरवर्षी नामविस्तार दिनी विद्यापीठ परिसरामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने विद्यापीठ परिसरामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी दरवर्षी येत असतात. यंदा देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता असून वाहतूक पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मिलिंद चौक ते मकई गेट हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. 14 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा बदल लागू असेल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन मिरघे यांनी दिली.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी वाहनधारकांनी वरील पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बंद असणारा मार्ग
छत्रपती संभाजीनगर शहरातील मिलिंद चौक ते मकाई गेट हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.
advertisement
पर्यायी मार्ग
नगरनाका/भावसिंगपुराकडून येणारी वाहने
नगर नाका किंवा भावसिंगपुराकडून मिलिंद चौकमार्गे बेगमपुरा, विद्यापीठ किंवा बीबी का मकबराकडे जाणारी वाहने आता मिलिंद चौक - बारापुल्ला गेट - मिलकॉर्नरमार्गे वळवण्यात आली आहेत.
बेगमपुरा/बीबी का मकबराकडून जाणारी वाहने
view commentsबेगमपुरा परिसरातून विद्यापीठ गेटमार्गे नगर नाका किंवा छावणीकडे जाणारी वाहने आता मकई गेट- टाऊन हॉल भडकल गेट-मिल कॉर्नर - बाबा पेट्रोल पंप या मार्गाने जाऊ शकतील.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नामविस्तार दिन: छ. संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल, वर्दळीचा रस्ता बंद, पर्यायी मार्ग











