संभाजीनगरात मध्यरात्री भीषण अपघात, मद्यधुंद चालकाने 6 जणांना उडवले, 3 वाहनांचा चक्काचूर

Last Updated:

Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगर शहरात एका मद्यधुंद कारचालकाने रात्री उशिरा पदमपुरा ते समर्थनगर परिसरात मोठा गोंधळ घातला.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एका मद्यधुंद कारचालकाने रात्री उशिरा पदमपुरा ते समर्थनगर परिसरात मोठा गोंधळ घातला. भरधाव वेगात कार चालवत आरोपीने ६ जणांना उडवले आणि तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. संतप्त नागरिकांनी चालकाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारचालक संकेत शंकर अंभोरे (रा. पदमपुरा) हा रात्री क्रांती चौकाकडून पदमपुऱ्याच्या दिशेने येत होता. अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ त्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या अनसाबाई भागीरथ बरंडवाल (वय ५५, रा. हडको) आणि एका १३ वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या.
या घटनेनंतर काही तरुणांनी त्याच्या कारचा पाठलाग सुरू केला. मात्र, अंभोरेने भरधाव वेगाने कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने पळवली. कार्तिकी सिग्नल परिसरात त्याने एका कारला पुन्हा धडक दिली आणि सावरकर चौकाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर बंडू वैद्य चौकात त्याने एका दुचाकीला धडक दिली. शेवटी समर्थनगर परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीला धडक दिल्यानंतर त्याची कार थांबली.
advertisement
दरम्यान, पाठलाग करणाऱ्या तरुणांनी त्याला पकडले. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी प्रकाश कटारे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरात मध्यरात्री भीषण अपघात, मद्यधुंद चालकाने 6 जणांना उडवले, 3 वाहनांचा चक्काचूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement