तोतया IAS कल्पना भागवतचा नवा प्रताप, माजी कुलगुरूही अडकला जाळ्यात

Last Updated:

तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत. तिने आयएएस अधिकारी असल्याचं सांगून माजी कुलगुरुंना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत. आता चक्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांनाच आयएएस अधिकारी असल्याचे सांगून कल्पना भागवतने त्यांना गंडा घातला आहे. या नव्या प्रतापामुळे तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत.

डॉ. शहाबुद्दीन पठाण यांचा जबाब नोंदवला

याप्रकरणी डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांनी सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आहे. कल्पना भागवतने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले. एका उच्च शिक्षित व्यक्तीला अशाप्रकारे कल्पनाने गंडा घातल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कल्पना भागवतने आतापर्यंत अशाप्रकारे अनेक उच्चभ्रू व्यक्तींना आणि प्रतिष्ठित अधिकाऱ्यांना आपला शिकार बनवल्याचा संशय आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
advertisement

मुख्य आरोपींची कसून चौकशी

गेल्या दोन दिवसांपासून तपास यंत्रणा तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत, केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई आणि अशरफ या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत. हे तिघे एकमेकांच्या संपर्कात कसे आले, किती वेळा भेटले, अशरफने त्याचा भाऊ गिल याला कल्पनाच्या संपर्कात का आणले आणि त्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर तपास केंद्रीत करण्यात आला आहे.
advertisement

आंतरराष्ट्रीय संबंधांची शक्यता

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. कल्पना भागवतचा प्रियकर अफगाणिस्तानचा असून त्याचा भाऊ पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहे. या दोघांसोबतही कल्पनाचा संपर्क असल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेले आहेत की काय, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तोतया IAS कल्पना भागवतचा नवा प्रताप, माजी कुलगुरूही अडकला जाळ्यात
Next Article
advertisement
Pannalal Surana : राज्याच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन
सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा कालवश
  • समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला! ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

  • समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला! ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

  • समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला! ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

View All
advertisement