#वेध गणरायाच्या आगमनाचे : गणपती बाप्पाच्या मूर्तीत झाली वाढ, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी आहे परिस्थिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मूर्ती बनवण्याचे काम आता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. यावर्षी मूर्तीच्या किमतीमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी वाढ झाल्याची व्यापारी सांगत आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : वर्षभरापासून आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतो. आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाची मूर्ती बनवण्याचे काम आता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तसेच लवकरच मुर्ती या बाजारामध्ये विक्रीसाठी देखील येतील. पण यावर्षी मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मूर्ती बनवण्याचे काम आता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. यावर्षी मूर्तीच्या किमतीमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी वाढ झाल्याची व्यापारी सांगत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीही वाढ झालेली आहे. मूर्ती बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. यामध्ये पीओपी, रंग, शाडूची माती यांचे भाव वाढलेले आहेत.
advertisement
पीओपीच्या मागच्या वर्षी 180 रुपयाला गोणी येत होती. तर यावर्षी गोणी ही 220 रुपयांना मिळत आहे. तसंच रंगांमध्ये देखील वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे जी मजुरी होती मूर्ती बनवण्यासाठी त्यामध्येही 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी मजुर हे मूर्ती बनवण्यासाठी मजूरी ही 500 रुपये घेत होते. पण यावर्षी 600 ते 700 रुपये दिवसाला मजुरांना द्यावी लागत आहे, असे मूर्ती विक्रेते महावीर जिनवाल यांनी सांगितले.
advertisement
मागच्या वर्षी 10 इंचाची गणपती बाप्पाची मूर्ती ही 110 रुपयाला येत होती. पण यावर्षी ही मूर्ती 140 ते 150 रुपये असा भाव असणार आहे. तसेच मोठ्या मुर्तींच्या किमतीमध्येही भाववाढ झाली आहे. मागच्या वर्षी आम्ही साडेचार हजार मूर्ती तयार केल्या होत्या. पण यावर्षी भाव वाढल्याने आम्हाला फक्त 3000 मू्र्ती तयार करता आल्या. वस्तूंच्या किंमतीत झालेली भाववाढ, हे यामागचे प्रमुख कारण असल्याचेही महावीर जिनवाल यांनी सांगितले.
advertisement
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुर्तींच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पण वाढ झाली असली तरी ग्राहक मात्र आधीपासूनच मूर्ती या बुक करून ठेवत आहेत. तसेच मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. जर तुम्हाला पण गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही अगोदरच ही मूर्ती बुक करून ठेवा. कारण नंतर मूर्ती मिळेल का नाही, हे आम्ही सांगू शकत नाही, असे येथील मूर्ती विक्रेते जतीन कौल यांनी सांगितले.
advertisement
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 07, 2024 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
#वेध गणरायाच्या आगमनाचे : गणपती बाप्पाच्या मूर्तीत झाली वाढ, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी आहे परिस्थिती, VIDEO