गणेशोत्सवात ढोल-ताशांचा आवाज घुमतो, पण तुम्हाला माहितीये का कुठं स्वस्तात मिळतो?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
गणेशोत्सवात ढोल-ताशांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरात ही वाद्य अगदी स्वस्तात मिळतात.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजर जणू ठरलेलाच असतो. अनेकजण या काळात ढोल, ताशा, ढोलकी, डमरू आदी वाद्यांची खरेदी करत असतात. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरात ही वाद्य अगदी स्वस्तात मिळतात. येथील बॉम्बे हे दुकान या वाद्यांसाठी प्रसिद्ध असून ते स्वत: बनवून वाद्यांची विक्री करतात. गेल्या चार पिढ्यांची ही परंपरा आता शेख रफिक हे जपत आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात बॉम्बे हे दुकान आहे. या दुकानांमध्ये ढोल, ताशा, ढोलकी, मृदुंग, तबला आणि पखवाज हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. तसंच हे सर्व साहित्य रफिक शेख यांचं कुटूंब स्वत: तयार करतं. गेल्या चार पिढ्यांपासून ते हेच काम करत आहेत. मराठवाडा आणि इतर भागातूनही वाद्यांच्या खरेदीसाठी लोक इथे येत असतात.
advertisement
अगदी स्वस्तात मिळतो ढोल-ताशा
या ठिकाणी सर्वच वाद्ये पुण्या-मुंबईच्या तुलनेत स्वस्तात मिळतात. ढोलची किंमत 800 रुपयांपासून सुरू होते. 1800 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे ढोल आणि ताशे मिळतात. तबला 1 हजार रुपयांपासून मिळतो. तर ढोलकीची किंमतही 1 हजार रुपयांपासूनच आहे.
advertisement
चौथी पिढी व्यवसायात
view commentsबॉम्बे या दुकानात सध्या चौथी पिढी काम करतेय. आम्ही दुसऱ्या राज्यातून वाद्ये बनवण्यासाठी लागणारं साहित्य मागवतो. सर्व प्रकारची वाद्ये याठिकाणी स्वत: बनवतो. त्यामुळे ढोल-ताशा आणि इतर वाद्यांना मोठी मागणी असते. होलसेल आणि रिटेल दोन्ही दरांमध्ये या साहित्याची विक्री केली जाते, असे शेख रफिक सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 10, 2024 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
गणेशोत्सवात ढोल-ताशांचा आवाज घुमतो, पण तुम्हाला माहितीये का कुठं स्वस्तात मिळतो?

