Chhatrapati Sambhajinagar News: कारागृहात तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला 10 कैद्यांनी घेरलं अन्.. छ. संभाजीनगरमधील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील एका कारागृहात कैद्यांच्या टोळक्यानं थेट तुरुंग अधिकाऱ्यांवरच हल्ला केल्याची घटना घडली आहे.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट : हरसूल कारागृहामध्ये कैद्यांची तपासणी करत असताना कारागृहातील एका कैद्याच्या टोळक्याने तुरुंगात फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. अचानक त्यांनी तुरुंग अधिकार्यावर हल्ला चढवला. यामध्ये अधिकारी कर्मचारी जखमी झाले असून घटनेमुळे कारागृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यामध्ये 10 कैंद्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
याप्रकरणी अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये असलेल्या हरसूल कारागृहामध्ये मोठ्या संख्येने कैदी आहेत. यात पुण्यातील कैद्यांची संख्या अधिक आहे. या सर्वांवर अंडर ट्रायल सुनावणी सुरू आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास तुरुंग अधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर हे त्यांच्या पथकासह बॅरिकेटची तपासणी करत असताना कारागृहातील न्यायधीन बंदी क्रमांक 273 शाहरुख अकबर शेख 134 व 24 त्याच्यासह आठ ते दहा टोलक्याने प्रवीण मोहोळकर यांच्याशी विनाकारण वाद घातला. हा वाद वाढत असतानाच त्यांनी पथकावरती हल्ला केला. या सर्वांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये प्रवीण मोडकर यांच्यासोबत असलेले चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
हरसूल कारागृहातील तरुंग अधिकाऱ्यावर हल्ला करणारे कैदी हे मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. घटनेची माहिती मिळताच हरसूल कारागृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवीण मोडकर यांच्या तक्रारीवरून हरसूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी शाहरुख शेख आणि सहा कैद्यांविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 28, 2023 5:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar News: कारागृहात तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला 10 कैद्यांनी घेरलं अन्.. छ. संभाजीनगरमधील घटना