Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू, किडनी अन् लिव्हरला सूज; कशी आहे प्रकृती?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर, 03 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी ९ दिवस आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी सरकारला २ महिन्यांचा वेळ दिला आहे. दरम्यान, ९ दिवस उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली असून बरे होण्यासाठी एक ते दोन आठवड्याचा वेळ लागेल असं सांगण्यात येतंय.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जरांगे पाटलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केलं आहे. आमरण उपोषणामुळे जरांगे पाटलांच्या किडणी आणि लिव्हरला सुज आली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक आहे. प्रकृतीत सुधारणा होत आहे. ९ दिवस उपोषणामुळे काही त्रास होत आहेत.
advertisement
कशी आहे तब्येत
जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटलांची तब्येत चिंताजनक आहे. बीपी थोडा कमी होता आणि त्यांच्या किडणी आणि लिव्हरला सूज आहे. रिकव्हर व्हायला एक ते दोन आठवड्याचा वेळ लागेल. काळजी करण्यासारखं काही नाही पण त्यांना विश्रांतीची गरज आहे. एक ते दोन आपल्या अपेक्षेनुसार ते सहज बरे होतील.
advertisement
जरांगे पाटील म्हणाले की, आता तब्येत थोडी बरी आहे. अंग आणि डोकं दुखतंय. कोणताही ताण तणाव नाही. उपोषणामुळे थोडा त्रास होतोय. दूध भात खाल्लंय. बोलण्यास त्रास होत आहे. सरकारला वेळ दिलाय तर आरक्षण देईल. मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे. तयारी केली नाहीय पण वेळ आल्यावर सगळं सांगू.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2023 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू, किडनी अन् लिव्हरला सूज; कशी आहे प्रकृती?