Gunratna Sadavarte : मराठा आरक्षणाला सदावर्तेंचा पुन्हा विरोध, हायकोर्टात 216 पानी याचिका दाखल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
राज्यभारत झालेल्या हिंसक आंदोलनाला मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
मुंबई, 03 नोव्हेंबर : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. जालन्यातील अंतरवाली सराटी इथं ९ दिवस मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं. अखेर सरकारने आणखी दोन महिन्यांचा वेळ मागून घेत जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावलं. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता मराठा आरक्षणाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्तींपुढे याचिका सादर करण्यात आली. मात्र न्यायालयाने तातडीने यावर सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने 8 नोव्हेंबरला याचसंदर्भातील अन्य याचिकांसोबत सुनावणी घेण्यात येणार आहे.
advertisement
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मुंबई पोलीस आयुक्त,भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक जालना,गोंडीचे पोलीस निरीक्षक,CBI महासंचालक, राज्य सरकार आणी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून यात सदावर्ते यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
राज्यभारत झालेल्या हिंसक आंदोलनाला मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्र अशांत करून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सदावर्तेंनी याचिकेत म्हटलंय. तसंच शरद पवार आणी उद्धव ठाकरे यांचा,याला आशीर्वाद आहे असाही आरोक केला आहे. महाराष्ट्र अशांत करणे हा काही राजकीय पक्षांचा डाव आहे. अनेक वृत्तवाहिन्यांच्या बातम्या,वर्तमान पत्रांच्या बातम्यांचा दाखला यासह पोलीस अहवाल यासोबत, गुणरत्न यांनी हायकोर्टात सादरे केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2023 12:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gunratna Sadavarte : मराठा आरक्षणाला सदावर्तेंचा पुन्हा विरोध, हायकोर्टात 216 पानी याचिका दाखल