Nitesh Rane : ठाकरे कुटुंब डेहराडूनला गेले, हीच का मराठा आरक्षणाची काळजी? नितेश राणेंचा सवाल

Last Updated:

नितेश राणे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, कुणीतरी मला सांगितलं की, ठाकरे कुटुंबीय त्यांच्या कूक आणि स्टाफसह डेहराडूनला काल दुपारी गेले आहेत.

News18
News18
मुंबई, 03 नोव्हेंबर : भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ठाकरे कुटुंबीय डेहराडूनला गेल्याचा दावा नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट केली असून त्यात कुणीतरी मला सांगितलं की, ठाकरे कुटुंबीय त्यांच्या कूक आणि स्टाफसह डेहराडूनला काल दुपारी गेले आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ठाकरे कुटुंबीय डेहराडूनला गेले. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी असा प्रश्नही नितेश राणे यांनी विचारला. तसंच जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही असंही नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर होते. पण फडणवीस तेव्हा पक्षासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी नाही असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच आदित्य ठाकरेंचे नाव न घेता नितेश राणे म्हणाले की, लवकरच बेबी पेंग्विनला सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitesh Rane : ठाकरे कुटुंब डेहराडूनला गेले, हीच का मराठा आरक्षणाची काळजी? नितेश राणेंचा सवाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement