Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, छ. संभाजीनगरहून जाणाऱ्या 9 ट्रेन रद्द, या गाड्यांचे मार्ग बदलले
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway: मनमाड स्थानकातील नूतनीकरणामुळे 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान छ. संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मोठा फटका बसणार आहे. काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही उशिरा धावणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यामध्ये रेल्वेचे मोठे जाळे असून रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून मुंबई-पुण्यासह दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. अशातच रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मनमाड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे छ. संभाजीनगरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसलेला आहे. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला असून 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.
मनमाड स्थानकातील नूतनीकरणामुळे 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान छ. संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मोठा फटका बसणार आहे. नांदेड, हिंगोली, सिकंदराबादहून येणाऱ्या व जाणाऱ्या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तीन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे 20 हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
advertisement
हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नांदेड विभागातील नऊ गाड्यांसाठी रेक उपलब्ध नाहीत. त्यामुळे 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.
advertisement
रेकअभावी रेल्वे गाड्या रद्द
2 सप्टेंबर : परळी आदिलाबाद, आदिलाबाद-पूर्णा, पूर्णा-जालना, आदिलाबाद-नांदेड, नांदेड- आदिलाबाद
3 सप्टेंबर 25: जालना-नगरसोल, नगरसोल-जालना, नगरसोल नांदेड
4 सप्टेंबर : नांदेड-मेदचल...
5 सप्टेंबर : रेल्वे : रामेश्वरम-ओखा
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगाव, पाळधी
6 सप्टेंबर : रेल्वे : निजामाबाद-पुणे
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, परभणी, लातूर रोड,
advertisement
कुडूवाडी, दौंड 7 सप्टेंबर : रेल्वे : नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, हिंगोली, अकोला,भुसावळ, खंडवा
7 सप्टेंबर : रेल्वे : मुंबई- नांदेड तपोवन एक्स्प्रेस
बदलेला मार्ग : कल्याण, कर्जत लोणावळा, पुणे, दौंड, कुडूवाडी, लातूर रोड, परळी, परभणी या मार्गाने या रेल्वे गाड्या जातील.
रेल्वे : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस
advertisement
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुडूवाडी, दौंड, पुणे, कल्याण असा हा मार्ग असेल.
अंशत : रद्द केलेल्या रेल्वे
6 सप्टेंबर : काचिगुडा - मनमाड एक्सप्रेस
कुठपर्यंत धावणार : काचिगुडा ते नगरसोल
7 सप्टेंबर : हिंगोली- मुंबई जनशताब्दी
कुठपर्यंत धावणार : हिंगोली ते नगरसोल.
धर्माबाद-मनमाड : कुठपर्यंत धावणार : धर्माबाद ते छत्रपती संभाजीनगर आहे.
advertisement
7 सप्टेंबर: मुंबई- हिंगोली जनशताब्दी मुंबई ते नगरसोलदरम्यान रद्द, नगरसोल ते हिंगोली धावेल मनमाड धर्माबाद मनमाड ते संभाजीनगर दरम्यान रद्द, संभाजीनगर ते पुढे धावणार मनमाड ते काचिगुडा मनमाड ते नगरसोलदरम्यान रद्द. नगरसोलपासून पुढे धावेल.
उशिरा सुटणाऱ्या गाड्या
7 सप्टेंबर रोजी साईनगर शिर्डी काकीनाडा पोर्ट रेल्वेचे नियोजित वेळेत सायंकाळी 5 वाजेची श्री साईनगर शिर्डी येथून सुटण्याची आहे. ही गाडी रात्री 8 वाजता सुटेल. नांदेड फिरोजपूर कँट गाडीची नांदेड येथून सुटण्याची नियोजित वेळ दुपारी 11.50 वाजेची आहे. ही गाडी दुपारी 12.20 वा. सुटेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 9:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, छ. संभाजीनगरहून जाणाऱ्या 9 ट्रेन रद्द, या गाड्यांचे मार्ग बदलले







