नवजात बाळ मृत्यूलाही पुरून उरलं, थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले, गाडीखाली आलं तरीही...

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेनं बाळाला जन्म देऊन अवघ्या दोन तासांत त्याला गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिलं. हे बाळ पहाटेच्या थंडीत गारठलं, रात्री कुत्र्याने लचके तोडले, तरीही हे बाळ मृत्यूला पुरुन उरलं. या प्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.
ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे ५:३० वाजता पुंडलिकनगर येथील गजानन महाराज मंदिर रस्त्यावर उघडकीस आली. एका २४ वर्षीय तरुणीने कुटुंबापासून आपली गर्भधारणा लपवण्यासाठी घरातच बाळाला जन्म दिला आणि त्याची नाळ कापली. त्यानंतर बाळाला एका गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकून दिले.
पहाटेच्या थंडीत हे बाळ गारठलं. भटक्या कुत्र्यांनी गोणीला दोन वेळा लचके तोडले. तसेच, ही गोणी एकदा बसखालीही आली. तरीही बाळ सुरक्षित राहिले. काही सतर्क नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांनी बाळाच्या आईचा शोध घेत, तिला ताब्यात घेतलं. तिची चौकशी केली असता, तिनेच आपल्या बाळाला अशाप्रकारे कचऱ्यात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. बाळ सध्या रुग्णालयात असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नवजात बाळ मृत्यूलाही पुरून उरलं, थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले, गाडीखाली आलं तरीही...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement