Crime News : छ. संभाजीनगरात सैराट; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर, अविनाश कानडजे: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. भावानेच डोक्यात कुऱ्हाड घालून आपल्या बहिणीची हत्या केली आहे. या प्रकरणात फर्दापूर पोलीस ठाण्यात चार जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमप्रकरणातून भावांनी आपल्याच बहिणीची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिची हत्या करण्यात आली. चंद्रकलाबाई असे मृत महिलेचं नाव आहे. याबाबत फर्दापूर पोलीस ठाण्यात कृष्णा बावस्कर, शिवाजी बावस्कर, धोंडिबा बावस्कर, शेवंताबाई धोंडिबा बावस्कर यांच्याविरोधात शमीम शहा कासम याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्रियकरालाही बेदम मारहाण
दरम्यान फिर्यादी शमीम शहा कासम याचा भाऊ रहीम शहा कासम याच्यासोबत चंद्रकलाबाई हिचे प्रेमसंबंध होते, या प्रकरणात रहीम शहा याला देखील आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचं शमीम शहा यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात चौघांविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फर्दापूर पोलीस करत आहेत.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 17, 2023 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Crime News : छ. संभाजीनगरात सैराट; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून