Crop Insurance : मोठी बातमी! फक्त 'त्या' शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विम्याचा लाभ, नव्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे, प्रतिनिधी : पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. तालुक्यातील 22 हजार 524 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. 15 एप्रीलपासून बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी माहिती दिली आहे.
बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील 22 हजार 524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 एप्रिलपासून वर्ग होणार आहे. तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या 72 तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहे. परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या 22 हजार 524 शेतकऱ्यांचा यात समावेश केला आहे, अशी माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली आहे.
advertisement
शेतकऱ्यांचं नुकसान
गेल्या वर्षी खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पेरलेलं पीक वाहून गेलं, तर काही ठिकाणी हाता ताोंडाशी आलेला घास हिरवला गेला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. मात्र पीक विम्यामुळे काहीप्रमाणात का होत नाही पण आधार मिळण्याची शक्यता आहे. येत्या 15 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
April 07, 2024 7:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Crop Insurance : मोठी बातमी! फक्त 'त्या' शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विम्याचा लाभ, नव्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका?