कधी हॉटेल तर कधी रिसॉर्ट, संभाजीनगरात ग्रामसेविकेवर वारंवार अत्याचार, पंचायत समिती सभापतीच्या पतीचा कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीने ग्रामसेविकेवर लैंगिक अत्याचार केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीने ग्रामसेविकेवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं नोकरी घालवण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेसोबत संबंध ठेवतानाचे खासगी फोटो आणि व्हिडीओ शूट केले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुरवसे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे, तो बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्याती खांडवी येथील रहिवासी आहे. आरोपी विवाहित असून त्याने वारंवार ग्रामसेविकेवर अत्याचार केला आहे. त्याने पीडितेला आपल्या पतीसोबत घटस्फोट घ्यायला देखील भाग पाडल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.
advertisement
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये आरोपीची पत्नी गेवराई पंचायत समितीची सभापती होती. त्यावेळी पंचायत समितीचा सर्व कारभार संशयित आरोपी दीपक सुरवसे हाच पाहत असे. कामाच्या निमित्ताने तो अनेकदा पीडित ग्रामसेविकेच्या संपर्कात होता.
दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसेने पीडित ग्रामसेविकेला संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलमध्ये बोलावले. इथं त्याने एक रूम बुक केली होती. कामाच्या नावाखाली त्याने तिला रूममध्ये बोलावले आणि जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने विरोध केला असता आरोपीनं तिला नोकरी घालवण्याची धमकी दिली. यानंतर त्याने संबंध ठेवतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील काढले.
advertisement
हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं संभाजीनगर, इगतपुरी, नाशिक आणि अहिल्यानगर येथील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यासही भाग पाडलं. तसेच, पीडितेच्या पतीला मारण्याचा कटही आखला होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २ जुलै रोजी आरोपीने पीडित महिला राहत असलेल्या संभाजीनगर येथील परिसरात येऊन गोंधळ घातल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 12, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कधी हॉटेल तर कधी रिसॉर्ट, संभाजीनगरात ग्रामसेविकेवर वारंवार अत्याचार, पंचायत समिती सभापतीच्या पतीचा कांड