Pune : सोसायटी दबा धरून बसले, पिस्तुलातून गोळीबार; आंदेकर टोळीला मदत कुणी केली? आयुषच्या आईची फिर्यादीत धक्कादायक माहिती!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Ayush Komkar Murder Case : आयुष याच्या खुनाचा कट बंडू आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Pune Crime News : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठ परिसरात गॅंगवाराचा भडका उडाला होता. त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून करून घेतला. आरोपींना 11 गोळ्या झाडल्यानंतर त्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. त्यामुळे आयुषचा जागीच मृत्यू झाला. टपका रे टपका या गाण्यावर ठेका धरत आरोपींनी 19 वर्षाच्या आयुषवर बेधुंद गोळीबार केला. अशातच या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकरने फिर्याद नोंदवली आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद
आयुष कोमकर प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
advertisement
गोळीबार करणाऱ्यांना मदत कुणी केली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडू आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
advertisement
वाद कधी सुरू झाला?
दरम्यान, वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून दुकानावर महापालिका अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला. त्यानंतर आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाड याची मदत त्यांनी घेतली . दरम्यान, गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने नाना पेठेत खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचं तपासात उघड झालं होतं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : सोसायटी दबा धरून बसले, पिस्तुलातून गोळीबार; आंदेकर टोळीला मदत कुणी केली? आयुषच्या आईची फिर्यादीत धक्कादायक माहिती!