बहुतेक भारतीय गरीब का? खरी चूक कुठे होते? हेज फंड मॅनेजरने दिले उत्तर धक्कादायक, सांगितला श्रीमंतीचा फॉर्म्युला

Last Updated:

Why Most Indians Stay Poor: भारतीय मेहनतीत कमी नाहीत; पण चुकीच्या नोकरी आणि गुंतवणुकीमुळे ते गरीबच राहतात, असा हेज फंड मॅनेजर अक्षत श्रीवास्तव यांचा दावा आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की खरी श्रीमंती म्हणजे हुशार गुंतवणूक आणि योग्य कर नियोजन.

News18
News18
नवी दिल्ली: आजकाल ब्रिटन किंवा अमेरिकेच्या गुंतवणूक गुरूंच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. पण आता भारतीय वंशाचे हेज फंड मॅनेजर आणि 'फिनफ्लुएंसर' (आर्थिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती) अक्षत श्रीवास्तव यांनी भारतातील मध्यमवर्गाला आरसा दाखवला आहे. 'बिझनेस टुडे'च्या एका अहवालानुसार अक्षत म्हणतात की- बहुतेक भारतीय गरीबच राहतात. यामागचे कारण त्यांची मेहनत नाही, तर चुकीच्या दिशेने केलेली मेहनत आणि चुकीची गुंतवणूक आहे. 'पैशातूनच पैसा तयार होतो' हे सत्य प्रथम स्वीकारावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
advertisement
पहिली पायरी: योग्य नोकरीची निवड
श्रीमंत बनण्याची सुरुवात योग्य नोकरी निवडण्यापासून होते. पण ती कोणतीही सामान्य नोकरी नसावी. ते अशा नोकरीला 'गोल्ड स्टँडर्ड जॉब्स' म्हणतात. जसे की मायक्रोसॉफ्ट, मॅकिंझी किंवा एआय लॅब्समध्ये काम करणे. या कंपन्यांमध्ये तुम्हाला पगारासोबतच कामाचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षणही मिळते. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात 'कंपनीचे नाव' महत्त्वाचे नसून 'कौशल्य' अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच मेटासारख्या कंपनीतून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याला लगेच दुसरी नोकरी मिळते. पण टीसीएसमधील कर्मचाऱ्याला ती सहज मिळत नाही.
advertisement
गुंतवणुकीतील मोठी चूक
नोकरीतून पैसे मिळायला सुरुवात झाल्यावर पुढील मोठी चूक गुंतवणुकीत होते. भारतीय लोक अनेकदा सुरक्षित पण कमी परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये अडकतात. जसे की एफडी (FD), पीएफ (PF) किंवा रिअल इस्टेट. श्रीवास्तव सांगतात की- गेल्या २० वर्षांत निफ्टी ५० चा खरा परतावा केवळ ८ टक्के राहिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या QQQM ने डॉलरमध्ये १६ टक्के परतावा दिला आहे. तसेच म्युच्युअल फंडांची क्रेझही निरुपयोगी आहे. कारण ८५ टक्के फंड इंडेक्सलाही मागे टाकू शकत नाहीत.
advertisement
श्रीमंत होण्याचे खरे सूत्र
श्रीवास्तव यांच्या मते- जेव्हा तुमच्याकडे २० ते ५० लाख रुपयांची बचत होते. तेव्हा 'वेल्थ एक्सप्लोजन' (संपत्तीचा मोठा स्फोट) होण्याची वेळ येते. या टप्प्यावर इक्विटीमध्ये (समभाग) ६०-८० टक्के गुंतवणूक करून ३-५ वर्षांत भांडवल दुप्पट करता येते. यासोबतच टॅक्स प्लॅनिंग करणेही महत्त्वाचे आहे. कारण श्रीमंत लोक फक्त कमवत नाहीत. तर कमीत कमी नुकसान होण्यावर लक्ष देतात.
advertisement
श्रीवास्तव यांचा अंतिम सल्ला आहे: "पैशातून वेळ खरेदी करा." म्हणजेच इतके पैसे कमवा की तुम्हाला दिवस-रात्र १६ तास काम करण्याची गरज नाही. तर तुम्ही धोरणात्मक निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. हीच खरी श्रीमंती आहे. अक्षत श्रीवास्तव यांचा हा सल्ला मध्यमवर्गीयांना हेच शिकवतो की- श्रीमंत होण्याचे रहस्य केवळ बचत नाही; तर योग्य नोकरी, हुशार गुंतवणूक आणि योग्य कर नियोजन यात दडलेले आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
बहुतेक भारतीय गरीब का? खरी चूक कुठे होते? हेज फंड मॅनेजरने दिले उत्तर धक्कादायक, सांगितला श्रीमंतीचा फॉर्म्युला
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement