लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास नकार, होणाऱ्या नवऱ्याने तरुणीला संपवलं, आधी अत्याचार केला मग...

Last Updated:

पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोचा निर्घृण खून केला आहे.

News18
News18
पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं खून करण्याआधी तिच्यावर बलात्कार देखील केला आहे. घरात कुणीही नसताना आरोपीनं हे कांड केलं आहे. या पीडित तरुणीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्याच्या बिबलधर गावातील रहिवासी असलेल्या तरुणीचं आरोपीसोबत लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह होणार होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणीचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ती घरात एकटीच होती. तिचा होणारा नवरा तिथे आला आणि त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला.
advertisement
तरीही आरोपीनं तिच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. पण लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणार नाही, असं तरुणीने सांगितलं. यानंतर आरोपी संतापला. त्याने रागाच्या भरात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचा गळा दाबून खून देखील केला.
या प्रकारानंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी मुलीचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना मुलगी मृतावस्थेत आढळली. मुलीच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास नकार, होणाऱ्या नवऱ्याने तरुणीला संपवलं, आधी अत्याचार केला मग...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement