Chandra Grahan 2025: एका राशीवर चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणार, शुभ की अशुभ कसे परिणाम होणार?

Last Updated:

Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारं चंद्रग्रहण या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे.

Chandra Grahan 2025 : एका राशीवर चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणार, शुभ की अशुभ कसे परिणाम होणार?
Chandra Grahan 2025 : एका राशीवर चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणार, शुभ की अशुभ कसे परिणाम होणार?
मुंबई: धार्मिक मान्यतेनुसार, या चंद्रग्रहणाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात पूर्ण स्वरूपात दिसेल. हे ग्रहण रविवार रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल. ग्रहणाचा मध्य रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी असेल तर मध्यरात्री 1 वाजून 27 मिनिटांनी ग्रहण संपेल. हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे.
इंदुर येथील महाकाली मंदिरातील पंडित गुलशन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चंद्रग्रहण कुंभ राशी आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे पूर्वा भाद्रपद नक्षत्र आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण अशुभ ठरेल. या ग्रहणामुळे पर्वतीय प्रदेशात नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. लोकांच्या मनात युद्धाची भीती निर्माण होईल. व्यापारी वर्गावर ग्रहणाचा संमिश्र परिणाम होईल.
advertisement
रविवारी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाचा 12 राशींवर होणारा परिणाम
मेष रास: मेष राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. या राशिच्या व्यक्तींना ग्रहणामुळे अनेक फायदे मिळणार आहेत.
वृषभ रास: वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पितृपक्षातील चंद्रग्रहण सुख-संपदा घेऊन येईल.
मिथुन रास: या राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी खग्रास चंद्रग्रहण चांगले ठरणार नाही. चंद्रग्रहणाच्या परिणामांमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची मानसिक चिंता वाढेल.
advertisement
कर्क रास: कर्क राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. या राशिच्या व्यक्तींच्या आयुष्यावर ग्रहणामुळे सुखद परिणाम होणार आहेत.
सिंह रास: सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील चंद्रग्रहण चांगलं ठरणार नाही. या व्यक्तींच्या घरात कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे.
कन्या रास: चंद्रग्रहणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींचा विकास तर होईल मात्र, त्यासाठी त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.
advertisement
तूळ रास: तूळ राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाचा परिणाम म्हणून जास्त प्रवास करावा लागू शकतो. जास्त प्रवासामुळे त्यांना शारीरिक थकवा येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास: या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या व्यक्तींनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल.
धनु रास: धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात चंद्रग्रहणाचा शुभ परिणाम होणार आहे. वर्षातील दुसरं चंद्रग्रहण या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल.
advertisement
मकर रास: या राशीच्या व्यक्तींना ग्रहणाचे संमिश्र परिणाम दिसतील. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही सकारात्मक तर काही नकारत्मक बदल होतील.
कुंभ रास: हे चंद्रग्रहण कुंभ राशीत लागणार आहे. त्यामुळे राशीच्या व्यक्तींना ग्रहणाचे सर्वात जास्त नकारात्मक परिणाम सहन करावे लागतील. या व्यक्तींच्या शारीरिक वेदना आणि अस्वस्थता वाढेल.
मीन रास: या राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींचा आर्थिक विकास होईल.
advertisement
सुतक काळ
चंद्रग्रहणाचा सुतक काळ 9 तास अगोदर म्हणजे दुपारी 12 वाजून 57 मिनिटांपासून सुरू होईल. सुतक काळात पूजा आणि धार्मिक विधी करणे अशुभ मानलं जातं. या काळात लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रहणामुळे मंदिरांच्या पूजा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. ग्रहण सुरू होताच मंदिरांचे दरवाजे रात्री बंद केले जातील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandra Grahan 2025: एका राशीवर चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव पडणार, शुभ की अशुभ कसे परिणाम होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement