मराठवाड्यातून थेट अजमेर दर्शन, छ. संभाजीनगर मार्गे स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आणि थांबे
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: मराठवाड्यातून अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुससाठी जाणाऱ्या भाविकांना खूशखबर आहे. आता छत्रपती संभाजीनगरमार्गे थेट रेल्वे धावणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जातात. ही गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू केली आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार असल्याने मराठवाड्यातील हजारो भाविकांचा अजमेर शरीफचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
मछलीपट्टणम–अजमेर (07274) ही विशेष रेल्वे रविवारी, 21 डिसेंबर रोजी मछलीपट्टणम येथून सुटणार असून ती सोमवारी, 22 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकात दाखल होईल. पुढे ही गाडी मनमाड, भुसावळ, भोपाळ आणि चित्तोडगड मार्गे प्रवास करत मंगळवारी, 23 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता अजमेर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी अजमेर–मछलीपट्टणम (07275) ही विशेष गाडी सोमवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता अजमेरहून रवाना होईल. ही गाडी मंगळवारी, 29 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावर येणार आहे.
advertisement
दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील भाविकांसाठी सोयीचा विचार करून छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड मार्गाचा समावेश केला आहे. या विशेष गाडीला नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, लासूर, रोटेगाव, नगरसोल आदी महत्त्वपूर्ण थांबे देण्यात आले आहेत. यामुळे ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे. याव्यतिरिक्त हैदराबाद-हिस्सार रेल्वेदेखील छत्रपती संभाजीनगर येथून रविवारी रात्री 1.30 वाजता अजमेरमार्गे जाते, जो एक पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यातून थेट अजमेर दर्शन, छ. संभाजीनगर मार्गे स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आणि थांबे








