रक्षांबंधनादिवशी कपाट उघडलं अन् पायाखालची जमीनच सरकली! आईनेच 19 वर्षाच्या मुलीविरुद्ध केली तक्रार दाखल, असं काय पाहिलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sambhajinagar Crime News : 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनदिवशी महिलेच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. जेव्हा तिने कपाट उघडून पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Sambhajinagar Crime News : आईसाठी पोटच्या पोरीवरच गुन्हा दाखल करण्याची वेळ येणं, यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव कोणतंही नसावं. अशीच एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. एका आईने आयुष्यभर कष्ट करून जमा केलेले सोन्याचे दागिने आणि रोकड तिच्याच 19 वर्षांच्या मुलीने मित्रासाठी चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय काय घडलं? रक्षाबंधनाच्या आधी चोरीचा खुलासा कसा झाला? पाहा
14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने
ही घटना आहे हडको भागात राहणाऱ्या एका 58 वर्षीय सेवानिवृत्त महिलेची... आरोग्य विभागात नोकरी करून तिने आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी 14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने जमा केले होते. या दागिन्यांसोबतच घरात 1 लाख 55 हजार रुपयांची रोकडही होती. आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी ती प्रत्येक गोष्ट जपून ठेवत होती.
advertisement
रक्षाबंधनाला कपाट उघडून पाहिले अन्...
9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते. त्यावेळी तिच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. जेव्हा तिने कपाट उघडून पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कपाटातील डब्यात एकही दागिना नव्हता आणि सोबत असलेली 1 लाख 55 हजार रुपयांची रोकडही गायब होती. सुमारे 14.1 तोळ्यांचे दागिने आणि मोठी रक्कम चोरीला गेल्याने तिला मोठा धक्का बसला. तिने मुलाला विचारले, पण त्याला काहीच माहीत नव्हते. अकरावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीकडे विचारपूस केली, तेव्हा ती मात्र गडबडून गेली. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपला मित्र मंगेश विलास पंडित याला दागिने व पैसे दिल्याचे कबूल केले.
advertisement
मुलीविरुद्ध चोरीची तक्रार दाखल
मुलीने सांगितल्यावर आईने तात्काळ मंगेशकडे जाऊन चौकशी केली, पण त्याने दागिने आपल्याकडे नसल्याचे सांगितले. आपल्याच पोटच्या मुलीने केलेल्या या कृत्यामुळे आईचे मन दुखावले गेले. आयुष्यभर जपलेली कमाई एका क्षणात संपल्याचे पाहून तिला मोठा धक्का बसला. अखेर, तिला बेगमपुरा पोलीस ठाण्यात जाऊन मंगेश आणि आपल्याच मुलीविरुद्ध चोरीची तक्रार दाखल करावी लागली. पोलिसांनी मंगेशला अटक केली आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 13, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रक्षांबंधनादिवशी कपाट उघडलं अन् पायाखालची जमीनच सरकली! आईनेच 19 वर्षाच्या मुलीविरुद्ध केली तक्रार दाखल, असं काय पाहिलं?


