कामाचा ताण आणि 'बेडरुम सिक्रेट'ची देवाण घेवाण, डॉक्टर, गुरुजी हे बरं नव्हं! धक्कादायक प्रकरणं समोर
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marital Crisis : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरोसा सेलकडे नऊ महिन्यांत 1,258 वैवाहिक तक्रारी दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि शिक्षकांमधील वाढता भावनिक दुरावा, कामाचा ताण आणि सोशल मीडिया चॅटिंगमुळे नात्यांमध्ये गंभीर मतभेद निर्माण होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : घराला दिशा देणारे शिक्षक आणि जीव वाचवणारे डॉक्टर दोन्ही समाजातील आदर्श मानले जाणारे हे दोन वर्ग सध्या वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’कडे मागील नऊ महिन्यांत तब्बल 1,258 वैवाहिक तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील मोठा वाटा डॉक्टर आणि शिक्षक या उच्चशिक्षित वर्गाकडून आल्याचे समोर आले आहे.
पती-पत्नीमध्ये कमी होणारा संवाद, कामानिमित्त घरी उशिरा परतणे, भावनिक दुरावा आणि सोशल मीडियावरील खासगी चॅटिंग या साऱ्या कारणांमुळे अनेक कुटुंबांच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होताना दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉक्टर आणि शिक्षक या दोन्ही क्षेत्रात जबाबदाऱ्या प्रचंड असतात. सततची धावपळ, वाढलेली कामाची वेळ आणि मानसिक ताण यामुळे दाम्पत्यांना एकमेकांकडे लक्ष देण्यासाठी योग्य वेळच मिळत नाही. यामुळे भावनिक आधार कमी होतो, विश्वास कमकुवत होतो आणि हीच पोकळी कुणाकडून तरी भावनिक आधार घेताना चुकीच्या मार्गाकडे वळवते. भरोसा सेलने मिळालेल्या तक्रारींपैकी 421 प्रकरणांत मध्यस्थी करून दाम्पत्यांना पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळाले, हे विशेष
advertisement
एका महिला डॉक्टरने आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. सर्जन असलेले पती वारंवार “इमर्जन्सी ऑपरेशन”चे कारण देत उशिरा घरी परतत असत. संशय आल्याने पत्नीने चौकशी केली असता पतीचे रुग्णालयातील एका महिलेसोबत घनिष्ठ संबंध असल्याचा खुलासा झाला. दुसऱ्या घटनेत कनिष्ठ महाविद्यालयातील एका पुरुष शिक्षकाने पत्नीसंदर्भात तक्रार दिली. शिक्षिका असलेली पत्नी एका जुन्या मित्रासोबत सलग चॅट करत असल्याची माहिती मिळाल्यावर पतीने तपास केला. यात दोघांमध्ये अतिशय वैयक्तिक स्वरूपाचे संवाद आणि गोष्टी शेअर होत असल्याचे आढळून आले.
advertisement
मानसोपचारतज्ज्ञांचे सुचवलेले उपाय :
view commentsनात्यातील अपेक्षा, नाराजी आणि भावना नियमितपणे बोलून काढा आणि कामाचा ताण घरी आणू नये. दररोज थोडा वेळ फक्त दाम्पत्याने एकत्र घालवावा शिवाय सोशल मीडियावरील वागणुकीसाठी दोघांनीही स्पष्ट मर्यादा ठरवाव्यात. व्यावसायिक यश जितके महत्त्वाचे, तितकेच घरात एकमेकांप्रती आदर आणि कौतुक व्यक्त करणेही आवश्यक. उच्चशिक्षित दाम्पत्यांमध्ये वाढणारे मतभेद आणि घटस्फोटाकडे वळणारे संबंध टाळायचे असतील, तर काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कामाचा ताण आणि 'बेडरुम सिक्रेट'ची देवाण घेवाण, डॉक्टर, गुरुजी हे बरं नव्हं! धक्कादायक प्रकरणं समोर


