भाविकांसाठी आनंदाची बातमी, तिरुपतीसह शिर्डीसाठी धावणार आता साप्ताहिक रेल्वे, वेळ इथं चेक करा

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती आणि श्री साईनगर शिर्डी या दोन्ही प्रमुख देवस्थानांना जोडणारी नवी साप्ताहिक रेल्वे सेवा आता नियमितपणे सुरू होणार आहे.

तिरुपतीसह शिर्डीसाठी 14 पासून साप्ताहिक रेल्वे
तिरुपतीसह शिर्डीसाठी 14 पासून साप्ताहिक रेल्वे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती आणि श्री साईनगर शिर्डी या दोन्ही प्रमुख देवस्थानांना जोडणारी नवी साप्ताहिक रेल्वे सेवा आता नियमितपणे सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाने तिरुपती–श्री साईनगर शिर्डी–तिरुपती या नवीन रेल्वेला हिरवा कंदील दिला असून, ही सेवा 14 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. ‎‎नवीन सेवेच्या प्रारंभापूर्वी विशेष उद्घाटन रेल्वे 9 डिसेंबर रोजी धावणार असून, तिचे लोकार्पण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली.
‎रेल्वे क्रमांक 17425/17426 असलेली ही साप्ताहिक एक्स्प्रेस तिरुपतीहून आठवड्यातील मंगळवारी सकाळी 11.10 वाजता सुटेल. गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या मार्गांवरून प्रवास करत ही गाडी पुढे निघेल. बुधवारी दुपारी 12.58 वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन छत्रपती संभाजीनगरात दाखल होईल.
advertisement
त्यानंतर निर्धारित वेळापत्रकानुसार पुढील प्रवास करत, ही गाडी बुधवारी सायंकाळी 6.35 वाजता श्री साईनगर शिर्डी स्थानकात पोहोचणार आहे. या गाडीमुळे तिरुपती आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून, दोन्ही तीर्थक्षेत्रांमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
भाविकांसाठी आनंदाची बातमी, तिरुपतीसह शिर्डीसाठी धावणार आता साप्ताहिक रेल्वे, वेळ इथं चेक करा
Next Article
advertisement
Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement