Gauri Mukhavate: गौरीचे सुंदर मुखवटे, खरेदी करा 1500 रुपयांपासून, छ. संभाजीनगरमध्ये हे आहे लोकेशन,Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गौरीचे मुखवटे विक्रीसाठी आलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. आपण सर्वजण आतुरतेने यांची वाट बघत आहोत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गौरीचे मुखवटे विक्रीसाठी आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा सुंदर मुखवटे घ्यायचे असतील तर तुम्ही सर्व संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरात जाऊन मुखवटे खरेदी करू शकता.
गौराईचे लवकरच आगमन होणार आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गौराईचे मुखवटे विक्रीसाठी आलेले आहेत. सध्या अमरावतीच्या मुखवट्यांना मोठी मागणी आहे. या ठिकाणी 1500 रुपयांपासून ते साडेसात हजारांपर्यंत गौरीचे मुखवटे आहेत. त्यासोबतच पेनचे देखील मुखवटे या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
पण अमरावतीच्या मुखवट्यांना मोठी मागणी आहे. अमरावतीच्या मुकुटामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. कारण की वेगवेगळ्या कारागिरांनी हे मुखवटे बनवलेले आहेत. यामध्ये तुम्हाला साधे मुखवटे त्याचबरोबर गालावर खळी असणाऱ्या गौराईंचे मुखवटे उपलब्ध आहेत. त्यासोबतच या ठिकाणी महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या ज्या कोथळे आहेत त्या देखील उपलब्ध आहेत.
यामध्ये तुम्हाला महालक्ष्मीसाठी नवीन पॅटर्नच्या रेडिमेट कोथळे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला फक्त साडी नेसण्याची आवश्यकता आहे. तसंच स्टीलचा देखील कोथळा उपलब्ध आहे. यांची किंमत देखील पंधराशे रुपयांपासून सुरुवात होते. तसंच महालक्ष्मीचे बाळ असतात त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी तुम्हाला सुंदर असे ड्रेस उपलब्ध आहेत.
advertisement
यामध्ये तुम्हाला पैठणी पॅटर्न खानाच्या कापडाचे ड्रेस वेलवेटचे ड्रेस देखील उपलब्ध आहेत. महालक्ष्मीसाठी लागणारे सर्व दागिने या ठिकाणी उपलब्ध आहेत ते सुद्धा अगदी पन्नास रुपयांपासून याची सुरुवात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तुम्हाला सुद्धा सुंदर मुखवटे खरेदी करायचे असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी येथे येऊन मुखवटे खरेदी करू शकता.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Gauri Mukhavate: गौरीचे सुंदर मुखवटे, खरेदी करा 1500 रुपयांपासून, छ. संभाजीनगरमध्ये हे आहे लोकेशन,Video

