छत्रपती संभाजीनगरच्या नगरपालिकांचे आरक्षण जाहीर; कन्नड, पैठणमध्ये महिलाराज; गंगापूर, वैजापूर, सिल्लोडमध्ये कोणाला संधी?

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीस नगरपालिका आरक्षण सोडत निघाली असून कन्नड, पैठण, खुलताबादमध्ये महिलाराज पाहायला मिळत आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर:  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील ) नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीस नगरपालिका आरक्षण सोडत निघाली आहे.
advertisement
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले असून, यामुळे आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मोठा संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ मानल्या जात असल्याने याचे राजकीय महत्त्व मोठे आहे.
advertisement

कन्नड, पैठण, खुलतामध्ये महिलाराज

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गंगापूर –सर्वसाधारण, वैजापूर – इतर मागास वर्ग, कन्नड – सर्वसाधारण महिला, खुलताबाद – सर्वसाधारण महिला,फुलंब्री – सर्वसाधारण,सिल्लोड – सर्वसाधारण आणि पैठण – सर्वसाधारण महिलांसाठी असणार आहे. जिल्ह्यात आरक्षण निश्चित झाल्याने आता उमेदवार निश्चितीसाठी सुद्धा वेग येणार आहे.

प्रशासनाची तयारी सुरू

advertisement
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा आणि तोटा होईल? हे निवडणुकीवेळी स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरच्या नगरपालिकांचे आरक्षण जाहीर; कन्नड, पैठणमध्ये महिलाराज; गंगापूर, वैजापूर, सिल्लोडमध्ये कोणाला संधी?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement