advertisement

Shiv Jayanti 2026: शिवजयंतीला राहुल गांधींची ‘ती’ पोस्ट, थेट कोल्हापूर कनेक्शन समोर, का होतेय चर्चा?

Last Updated:

Shiv Jayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोचं थेट कोल्हापूर कनेक्शन समोर आलंय.

Shiv Jayanti 2026: शिवजयंतीला राहुल गांधींची ‘ती’ पोस्ट, थेट कोल्हापूर कनेक्शन समोर, का होतेय चर्चा?
Shiv Jayanti 2026: शिवजयंतीला राहुल गांधींची ‘ती’ पोस्ट, थेट कोल्हापूर कनेक्शन समोर, का होतेय चर्चा?
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज, 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभरात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केलंय. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा असून यातील फोटोचं थेट कोल्हापूर कनेक्शन समोर आलंय.
राहुल गांधींची पोस्ट काय?
“शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा! शिवाजी महाराज हे पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय नेतृत्वाचे अद्वितीय प्रतीक आहेत. त्यांचे जीवनदर्शन आणि साहस आपल्याला आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते,” अशी पोस्ट करून राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आहे. विशेष म्हणजे त्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे.
advertisement
फोटोत काय?
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत त्यांनी हातात शिवरायांची पूर्णाकृती मूर्ती घेतली असून ती वर उंचावलेली आहे. तसेच राहुल यांच्या डोक्यावर कोल्हापुरी फेटा आणि कपाळावर गंधही दिसत आहे. यावरून हा फोटो कोल्हापुरातील असल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. 6 ऑक्टोबर 2024 रोजी या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते. आता राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा फोटो याच कार्यक्रमातील असल्याचं दिसत आहे. खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित होते.
advertisement
शिवरायांच्या पुतळ्याचे वेगळेपण
कसबा बावडा येथील शिवरायांचा पुतळा पाचगावमधील मूर्तिकार सतीश घारगे यांनी साकारला आहे. तर आमदार सतेज पाटील हे या पुतळ्याचे संकल्पक आहेत. हा पुतळा समकालीन 16 तैलचित्रांचा बारकाईने अभ्यास करून बनवला आहे. 21 फूट उंचीचा चबुतरा असून पुतळ्याची उंची 12 फूट आहे. छत्रपती शिवरायांच्या समकालीन चित्रांमध्ये डोईवर जिगा, कलगीतूरा या शिरोभूषण मंदिल आहे. तसेच कमरेला शेला-पटक्यासह कट्यार व पाठीवर ढाल आहे. उजव्या हातामध्ये पट्टा, डाव्या हातामध्ये धोप (तलवार) आणि पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव आहेत.
advertisement
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर कोल्हापुरातील तो फोटो पोस्ट केल्यानंतर सतेज पाटील यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Jayanti 2026: शिवजयंतीला राहुल गांधींची ‘ती’ पोस्ट, थेट कोल्हापूर कनेक्शन समोर, का होतेय चर्चा?
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement