Chiplun : समोरच दीड वर्षांचा मुलगा होता, अन् कोमलने उचललं टोकाचं पाऊल, चिपळूण हादरलं

Last Updated:

आपल्या दीड वर्षांच्या मुलासमोर आईने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे.

समोरच दीड वर्षांचा मुलगा होता, अन् कोमलने उचललं टोकाचं पाऊल, चिपळूण हादरलं
समोरच दीड वर्षांचा मुलगा होता, अन् कोमलने उचललं टोकाचं पाऊल, चिपळूण हादरलं
स्वप्नील घाग, प्रतिनिधी
चिपळूण, 21 डिसेंबर : आपल्या दीड वर्षांच्या मुलासमोर आईने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. कोमल सचिन दिलवाले असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून तिचं वय 26 वर्ष होतं. चिपळूणच्या पाग परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. महिलेने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल, तिचा नवरा, दीड वर्षांचा मुलगा, सासू-सासरे राहत होते. गुरुवारी सकाळी कोमल आणि मुलगा हे दोघेच घरी होते. तर घरातली इतर माणसं कामानिमित्त बाहेर गेली होती.
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले, त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला. कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती, तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं, त्यावेळी समोरील दृश्य पाहून सासरेही हादरले. कोमलने गळफास घेतला होता तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू ओक्साबोक्शी रडत होता. त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावून घेतले. यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
advertisement
रुग्णालयात नेल्यावर कोमलला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. कोमल उच्चविद्याविभूषित होती, तिने हे पाऊल का उचललं? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कोमलच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chiplun : समोरच दीड वर्षांचा मुलगा होता, अन् कोमलने उचललं टोकाचं पाऊल, चिपळूण हादरलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement