advertisement

IAS Transferred: कॅबिनेट बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय

Last Updated:

IAS Officer Transferred : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्यातील पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आस्तिक कुमार पांडे यांची मुंबई एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विदर्भातील राळेगावचे प्रांत असलेले विशाल खत्री यांची बदली प्रकल्पाधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून डहाणू येथे करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता संपन्न झाली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले.

कॅबिनेट बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) आस्तिक कुमार पांडे (IAS:RR:२०११) आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई यांना सहआयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
advertisement
२) आर.एस. चव्हाण (IAS:SCS:२०१३) यांची मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३)राहुल गुप्ता (IAS:RR:2017) सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४) सत्यम गांधी (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
५) विशाल खत्री (IAS:RR:2022) सहायक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: कॅबिनेट बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement