CM Devendra Fadnavis : मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता कायदा...'

Last Updated:

CM Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी जोरदार संताप व्यक्त केला.

उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप,  'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
छत्रपती संभाजीनगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी जोरदार संताप व्यक्त केला. कायद्याचा चुकीचा अर्थ लावून आयोगाने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असून, यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ऐन मतदानाच्या काही तास निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सीएम फडणवीस यांनी म्हटले की, “एखादा व्यक्ती कोर्टात जातो म्हणून निवडणुका थांबवायच्या, हा काय नियम झाला? आजवर राज्यात किंवा देशात यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नाही. निवडणूक आयोग काहीतरी वेगळाच कायदा वाचत आहे की काय, कोणाचा सल्ला घेत आहे याची कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement

निवडणुका रद्द करणं चुकीचं; उमेदवारांच्या मेहनतीचा अपमान....

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “मी कायदा पाहिला आहे, वकिलांशी चर्चा केली आहे. सर्वांचेच एकच मत असून न्यायालयात एखादी याचिका दाखल झाली म्हणून निवडणूक पुढे ढकलता येत नाही. आयोग स्वायत्त आहे, हे मान्य आहे. पण हा निर्णय स्पष्ट चुकीचा आहे. उद्या मतदान असताना आजच निवडणूक लांबणीवर टाकणं म्हणजे उमेदवारांच्या अनेक दिवसांच्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं आहे. आता त्यांना पुन्हा 15-20 दिवस प्रचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
सरकार या निर्णयावर निवडणूक आयोगासमोर सादरीकरण करणार असून हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या असंगत आहे, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापे, मुख्यमंत्री म्हणतात...

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाने रात्री उशिरा छापेमारी केली. याबाबत मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की, “मला याची माहिती नाही. पण सत्तेत आहे की नाही, यावरून छापा पडतो की पडत नाही हे ठरत नाही. आमच्या कार्यकर्त्यावर तक्रार आली तरी कारवाई होते. माझी गाडीही तपासली जाते. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Devendra Fadnavis : मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis : मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप,  'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का
  • उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का

  • उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का

  • उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का

View All
advertisement