'नवी सुरुवात करतोय', आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Last Updated:

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे राजकीय हालचाली सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.

News18
News18
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आघाडी आणि युतीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने राजकीय फिल्डिंग लावताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत.
असं असताना आता राज्यात मनसे आणि ठाकरे गटाची नवी युती बघायला मिळू शकतो. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय, असं वक्तव्य करत संभाव्य युतीचे संकेतही दिली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे राजकीय हालचाली सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.
advertisement
'एक नवी सुरुवात करतोय...' असं ट्वीट करत त्यांनी ही घोषणा केली आहे. 'महाराष्ट्रधर्म' नावाची नवी पॉडकास्ट मालिका सुरू करणार असल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आज रविवारी (6 जुलै 2025 रोजी) सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिला पॉडकास्ट पब्लिश होणार आहे.
advertisement
advertisement
पहिल्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस वारीबद्दल माहिती देताना आणि त्याचं महत्त्व सांगताना दिसत आहेत. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते इंग्रजांच्या काळातही वारी कशाप्रकारे अविरत सुरू आहे, हेही फडणवीस या पॉडकास्टमध्ये सांगताना दिसत आहे. त्यांच्या या पॉडकास्टची प्रमुख थीम 'महाराष्ट्र धर्म' असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालणारे विविध विषय या पॉडकास्टमधून चर्चेला आणले जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'नवी सुरुवात करतोय', आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement