Maharashtra Politics: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल; बेळगावसाठी घेतला हा निर्णय

Last Updated:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता थेट बेळगाव आणि बिदरसारख्या डिस्प्युटेड भागांसाठी विशेष निधींची तरतूद केली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (राहुल झोरी, प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चिघळला होता. मात्र, आता महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता थेट बेळगाव आणि बिदरसारख्या डिस्प्युटेड भागांसाठी विशेष निधींची तरतूद केली आहे. लोकसभा निवडणूका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निधी मंजूर करताना बिदर-बेळगावमधील संस्थांनाही निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सरकारकडून दोन कोटींचा निधी मंजूर -
25 लाख रुपये - महाराष्ट्र सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी, निपाणी, बेळगावला 25 लाख रूपये मंजूर. तर 25 लाख रुपये रघुनाथ महाराज शिक्षण संस्था, बिदर या शाळेच्या बांधकामासाठी मंजूर केले आहेत.
25 लाख रुपये - सत्यम शिवम सुंदरम रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन, बिदर, बेळगाव, हॉस्पिटल संबंधी साहित्य खरेदीसाठी मंजूर
advertisement
ग्रंथालये, शाळांचे वर्ग, हॉल, मेडिकल व्हॅन अशा विविध उपक्रमांसाठी सेवाभावी संस्थांना राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
9 लाख रुपये - मेडिकल व्हॅन खरेदीसाठी जय बजरंग बहुउद्देशीय आदिवासी सेवाभावी संस्था, हिंगोली यांना देण्यात येणार
25 लाख रुपये - सुसज्ज ग्रंथालय उभारणी, तांबळेश्वर शिक्षण संस्था, गडहिंग्लज, कोल्हापूरसाठी देणार
25 लाख रुपये - महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह बांधकाम, दर्यापूर, अमरावती
advertisement
30 लाख रुपये - अभिनव युवा बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, जळगाव, शाळेचे बांधकाम करण्यासाठी
10 लाख रुपये - आदिराज प्रतिष्ठान, कर्जत, अहमदनगर, मेडिकल व्हॅन खरेदी
25 लाख रुपये - देवगिरी प्रतिष्ठान, बीड
10 लाख रुपये - नागनाथ महिला सेवाभावी संस्था, बीड, मेडिकल व्हॅन खरेदी
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल; बेळगावसाठी घेतला हा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement