पृथ्वीराज चव्हाणांच्या होमग्राऊंडमध्ये होणार मोठा भूकंप, भाजपनं लावली फिल्डिंग
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यापासून काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. काँग्रेसचे अनेक निष्ठावंत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपसह महायुतीच्या विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला आहे. पण अद्याप काँग्रेसमध्ये काही वजनदार नेत्यांनी आपापले गड कायम ठेवत, त्या त्या मतदारसंघात पक्ष बांधून ठेवला होता. मात्र आता काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांच्या होमग्राऊंडमध्ये देखील मोठे धक्के दिले जात आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. पृथ्वीराज चव्हाणांची अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे नेतेच आता त्यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा चव्हाण यांच्यासाठी होमग्राऊंडमध्ये बसलेला मोठा धक्का मानला जातोय. पुढील आठवड्यात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती भाजप आमदार अतुल भोसले यांनी दिली.
advertisement
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव असलेल्या तळबीड गावात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या सरपंच, सदस्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का मानला जात असून पुढील आठवड्यात भूकंप करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी सांगितले आहे.
advertisement
मलकापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय, निष्ठावंत मनोहर शिंदे यांचा पक्ष प्रवेश या भूकंपात निश्चित मानला जात आहे. साताऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अगोदर काँग्रेसचा गड ढासळत आहे. मात्र तब्बेत बरी नसल्याने पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत उपचार घेत आहेत. ते दिल्लीत असताना त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजकडून धक्के दिले जात आहेत. त्यामुळे ते साताऱ्यात कधी परतणार? असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
November 01, 2025 7:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पृथ्वीराज चव्हाणांच्या होमग्राऊंडमध्ये होणार मोठा भूकंप, भाजपनं लावली फिल्डिंग


