'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही..'; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात अजितदादांचा थेट इशारा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
दोन दिवसापूर्वी घटना घडली त्याचं दुःख आहे, आता त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. महाराजांच्या नावाला साजेस स्मारक उभं करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी देखील बोलणी सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली आहे. गाभिर्यानं लक्ष घातलं जातं आहे, जेवढ्या लवकर स्मारक उभारलं जाईल, तेवढ्या लवकर स्मारक करण्याचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, अरबी समुद्रातील स्मारक प्रकरण कोर्टात गेल्यामुळे अडकून पडले आहे, राम सुतार यांच्याशी बोलणं झालं आहे. पाहणी झाल्यानंतर त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जाईल. राम सुतार देखील या ठिकाणी येऊन पाहणी करतील. सर्व गोष्टींचा विचार करून पावलं उचलली जातील.
टेंडर कुणाला कसे दिल याबाबतची सर्व चौकशी केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पुन्हा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल ते ठरवतील. नेव्ही किंवा पीडब्ल्यूडी असा वाद घालण्यात अर्थ नाही बसून चर्चा करत असताना पाहणी गरजेची होती, ते आमचं कर्तव्य आहे, त्या भावनेतून मी इथं आलो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Sindhnur,Raichur,Karnataka
First Published :
August 30, 2024 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही..'; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात अजितदादांचा थेट इशारा


