गोड ऊसाची कडू कहाणी, साखर कारखान्यातील अपघातात बीडच्या कामगाराचा मृत्यू, धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई : गोड ऊसाची आणखी एक कडू आणि दुःखद कहाणी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबीयांचे निर्वहण करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुले-बाळे व कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे. ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसेच त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संरक्षण व स्थैर्य याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावीत केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मुंडे म्हणाले.
advertisement
गोड उसाची आणखी एक कडू आणि दुःखद कहाणी...
वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे.… pic.twitter.com/5X2umdNUIm
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 5, 2026
advertisement
गणेशच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डोंगरे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे करून त्यासंबंधी पाठपुरावा करेन, असे धनंजय मुंडे म्हणाले.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोड ऊसाची कडू कहाणी, साखर कारखान्यातील अपघातात बीडच्या कामगाराचा मृत्यू, धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट











