Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री यांच्या पाठिंब्यानंतर मुंडेची पहिली प्रतिक्रिया, 'इतकी मोठी शक्ती...'
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
धनंजय मुंडे यांनी गुरूवारी भगवान गडावर जाऊन डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. याच पाठिंब्यावर आता धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.गेल्या 53 दिवसांपासून मला जाणीवपुर्वक टार्गेट केलं जातंय.
Dhananjay Munde on Santosh Deshmukh Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होतेय. राज्य सरकार देखील मुंडे राजीनाम्याबाबत काहीच हालचाली करत नाही.त्यात धनंजय मुंडे यांनी गुरूवारी भगवान गडावर जाऊन डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. याच पाठिंब्यावर आता धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.गेल्या 53 दिवसांपासून मला जाणीवपुर्वक टार्गेट केलं जातंय. पण तुम्हाला माझा राजीनामा हवाय की धनंजय देशमुख यांना न्याय, असा खडा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य केले. भगवान गडावर आल्यावर मला एक वेगळी ऊर्जा मिळते हे ऊर्जेचे स्थान आहे त्या चरणी घेतलेल्या भूमिकेमुळे मी भाग्यवान आहे मागच्या 53 दिवसापासून मला जाणीवपूर्वक टारगेट केले जात आहे स्वर्गीय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मतावर आजही ठाम आहे मात्र काही नेते जाणीवपूर्वक राजकारण करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
advertisement
मुंडे पुढे म्हणाले, हे संकट आज आलेले नाही आहे. 53 दिवसांपासून आपण पाहताय इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियीवरून मला टार्गेट करून मीडिया ट्रायल चालवलं जातंय. मी त्यात कोठेही एकही अवाक्षर बोलेलो नाही.संकट 53 दिवसांच होतं. मी इथे कधीही आलो असतो. पण मी त्या भावनेने इथे आलेलो नाही. तर मी मंत्री झालो आहे.मंत्रिपद स्विकारल्यानंतर भगवान गडाचं दर्शन घेतलं नव्हतं. आता मुंबईला जाण्यााआधी त्यांच दर्शन घेतलं, असे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
advertisement
हा गड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभा आहे. यांच्यासारखी ताकद आणि शक्ती आणि बाबांचा विश्वास माझ्या पाठिमागे उभं राहणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. असा गड माझ्या संकटाच्या काळात पाठिमागे आहे. ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे.या शक्तीच मी श्ब्दात वर्णन करू शकत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 31, 2025 1:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री यांच्या पाठिंब्यानंतर मुंडेची पहिली प्रतिक्रिया, 'इतकी मोठी शक्ती...'


