कोकाटे आऊट, धनुभाऊ इन? अमित शाह यांना भेटून मंत्रिपदाची चर्चा? मुंडेंचं 'कामाचं ट्विट'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत सकाळी दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात त्यांनी भेट घेतली.
मुंबई : राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदाची खुर्ची डळमळीत होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीवारी चर्चेचा विषय ठरली आहे. धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे कोकाटे मंत्रिमंडळाबाहेर गेल्यावर धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत सकाळी दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात त्यांनी भेट घेतली. संसद भवनातच त्यांनी इतरही काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणल्याचे सांगितले जाते. अमित शाह यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा होत असताना त्यांच्या अमित शाह यांच्यासोबतीच्या भेटीने अधिकच सस्पेन्स वाढवला. मात्र आमच्या बैठकीत परळीच्या कामाविषयी चर्चा झाल्याचे धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले.
परळी ज्योतिर्लिंग आणि मतदारसंघातील कारखान्यासंदर्भात चर्चा
धनंजय मुंडे म्हणाले, आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. तसेच पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती, असे सांगायला मुंडे विसरले नाहीत.
advertisement
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प… pic.twitter.com/xr5IqIskwo
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 17, 2025
advertisement
अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे खूश
धनंजय मुंडे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. स्थानिक मुद्द्यांवर भेट झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली असली तरी अमित शाह यांच्या भेटीनंतर ते प्रचंड खूश असल्याचे तेथील उपस्थितांनी सांगितले. मात्र बीडचे खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडे मंत्री होऊ शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोकाटे आऊट, धनुभाऊ इन? अमित शाह यांना भेटून मंत्रिपदाची चर्चा? मुंडेंचं 'कामाचं ट्विट'










