60 हजारांची गुंतवणूक, आज दिवसाकाठी होतेय 60 हजारांची उलाढाल, मामा-भाचाच्या जोडीची कमाल

Last Updated:

ज्यांच्याकडे कामगार म्हणून काम त्यांनीच व्यवसायाला उभारी दिली. इतकंच नाही तर व्यवसाय सुरु करण्यासाठी उमरगा शहरातील सोमाणी आणि लढ्ढा या व्यावसायिकांनी 60 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन व्यवसाय सुरू करण्यास पाठबळ दिले.

+
प्रेरणादायी

प्रेरणादायी कहाणी

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : मामा भाचा या दोघांच्या जोडीने सर्वांसमोर एक मोठे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. एकेकाळी 60 हजार रुपयांची गुंतवणूक करुन या दोघांनी व्यवसाय सुरू केला आणि दिवसाकाठी ते तब्बल 60 हजार रुपयांची उलाढाल करत आहे. आज जाणून घेऊयात, त्यांची संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी.
भीमाशंकर सुरवसे आणि किरण सुरवसे असे या मामा-भाचा यांच्या जोडीची कहाणी आहे. कामगार ते उद्योजक असा भीमाशंकर सुरवसे यांचा संघर्षमय प्रवास आहे. ज्यांच्याकडे कामगार म्हणून काम केलं, त्यांनीच व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं. शिक्षण चालु असताना सन 2000 मध्ये एका सेल्स एजन्सीमध्ये 500 ते 600 रुपये महिना पगारावर त्यांनी कामगार म्हणून काम केलं.
advertisement
पोलीस भरतीसाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना झाली मोठी मदत, या तरुणानं केलं महत्त्वाचं कार्य
खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता, त्यात आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. 2002 साली त्यांनी कसंबसं बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे बारावीनंतर शिक्षण बंद करावे लागेल. यानतर कामगार म्हणून काही काळ काम केलं आणि पैसे साठवले. या पैशातून त्यांनी एक प्लॉट विकत घेतला.
advertisement
ज्यांच्याकडे कामगार म्हणून काम त्यांनीच व्यवसायाला उभारी दिली. इतकंच नाही तर व्यवसाय सुरु करण्यासाठी उमरगा शहरातील सोमाणी आणि लढ्ढा या व्यावसायिकांनी 60 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन व्यवसाय सुरू करण्यास पाठबळ दिले.
यानंतर 60 हजार रुपयांची गुंतवणूक करून 2013 मध्ये त्यांनी स्वतःचा तेल, कुरकुरे, चॉकलेट असा किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला. उमरगा शहरात बालाजी स्वीट मार्ट अँड बेकर्स नावाने त्यांचं मोठं दुकान उभारले. आज रोजी दिवसाला 60 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. तसेच महिन्याकाठी 18 ते 20 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज
भीमाशंकर सुरवसे यांना त्यांचे भाचे किरण सुरवसे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दोघा मामा भाच्यांनी व्यवसायास भरभराटी आणली आहे. व्यवसायाला मोठे स्वरूप दिले आहे. कमी प्रॉफिटने जास्तीत जास्त विक्री करून जास्तीत जास्त उलाढाल करण्याचा ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते, असे यावेळी भीमाशंकर सुरवसे यांनी सांगितले. जिद्द आणि इच्छाशक्ती असली तर व्यक्ती चांगली प्रगती करू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
60 हजारांची गुंतवणूक, आज दिवसाकाठी होतेय 60 हजारांची उलाढाल, मामा-भाचाच्या जोडीची कमाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement