police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज

Last Updated:

 

पोलीस भरतीसाठी इंजिनियर एमबीएचे विद्यार्थी 
पोलीस भरतीसाठी इंजिनियर एमबीएचे विद्यार्थी 
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्या महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील अनेक पदांसाठी पोलीस भरती घेण्यात येत आहे. या पोलीस भरतीसाठी विविध क्षेत्रातील विद्यार्थी हे परीक्षा देत आहेत. पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू असताना या मैदानी चाचणीमध्ये अनेक उच्चशिक्षित तरुणसुद्धा भरती प्रक्रियेत सहभागी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
advertisement
महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती घेण्यात येत आहे. सध्या संपूर्ण ठिकाणी पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. संभाजीनगर शहरातही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. शहर, ग्रामीण आणि एसआरपीएफ मधील पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पोलीस आयुक्तालयात 212 जागांसाठी ही भरती होणार आहे.
advertisement
212 जागांसाठी तब्बल इतके अर्ज - 
दरम्यान, 212 जागांसाठी तब्बल 16 हजार 133 अर्ज आले आहेत. तर कारागृहातील 315 पदांसाठी 70 हजार 333 इतके अर्ज आले आहेत. यामध्ये 50 गुणांची शारीरिक चाचणी ही असणार आहे. तसेच 100 मीटर धावणे, गोळाफेक आणि 1600 मीटर धावणे आहे.
15 वर्षांपासून किर्तनसेवेचं मिळालं फळ, अविनाश महाराजांच्या देवा बैलाला संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचा मान
अर्ज केलेल्या उमेदवारांवरुन किती मोठ्या प्रमाणात ही बेरोजरागीर वाढली आहे, हे यातून दिसून आले आहे. या पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांनीही अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी या पोलीस भरती चाचणीत इंजीनिअर, एमबीए, डी. फार्मसी, एमएससी, एमकॉम, एमए अशी पदवी घेतलेले तरुणही पोलीस भरतीसाठी सहभागी झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी भरती करणाऱ्या मुलांनी गर्दी केली होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही भरती सकाळी अकरा वाजेनंतर सुरू झाली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement