15 वर्षांपासून किर्तनसेवेचं मिळालं फळ, अविनाश महाराजांच्या देवा बैलाला संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचा मान
- Published by:News18 Marathi
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
हभप अविनाश महाराज हे बालपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. त्यांनी आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागामधील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र व सुप्रसिध्द कीर्तनकार हभप अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांच्या 'देवा' बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे श्री. महाडीक व त्यांच्या देवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
advertisement
संतश्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी रथासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांचा लाडका देवा बैल पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. मेढा येथील बैलबाजारात 2022 मधील सगळ्यात मोठी विक्रमी बोली करून देवा या बैलाची महाडिक यांनी खरेदी केली होता. तोच बैल आज पालखीचा मानकरी ठरला आहे.
advertisement
Vat Purnima 2024 : अनोखा आहे वटपौर्णिमेचा इतिहास, नेमकं काय आहे यामागची कहाणी, जाणून घ्या, विशेष महत्त्व
हभप अविनाश महाराज हे बालपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. त्यांनी आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. गेल्या 15 वर्षापासून ते सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई व राज्यातील इतर जिल्ह्यातही कीर्तन सेवा करत आहेत. अविनाश महाराज हे ऐतिहासिक कीर्तनही करतात. महाडिक यांच्या देवा या बैलाला हा मान मिळाल्यामुळे कुटुंबासह गावाची शान वाढली आहे.
advertisement
दरवर्षी, पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरच्या पांडूरंगाच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याच्या घरच्या बैलाला पालखी रथ ओढण्यासाठी मान मिळाला, यापेक्षा भगवंताची मोठी कृपा असूच शकत नाही, अशी भावना हभप अविनाश महाराज महाडीक यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
देवा बैलाचा खुराक -
view commentsदेवा बैल खरेदी केल्यानंतर त्याला एका पैलवानासारखा खुराक देण्यात येत होता. यामध्ये शेंगदाणा पेंड, एक लिटर दूध, बलराम गोळी पेन, आट्टा, गहू, ओला चारा ,सुका चारा असा दिवसात तीन वेळा त्याचा खुराक असायचा खरेदी करताना जशी देवाची तब्येत होती तशीच तब्बेत आजही ठेवले असल्याचे हभप अविनाश महाडिक यांनी सांगितले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 20, 2024 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
15 वर्षांपासून किर्तनसेवेचं मिळालं फळ, अविनाश महाराजांच्या देवा बैलाला संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचा मान

