संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप, धाराशिवमधील घटना, नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
ईट म्हणजे भूम तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावातील सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. कारण शाळेची गुणवत्ता दर्जेदार आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील जिल्हा परिषद शाळेला संतप्त पालकांनी कुलूप लावले. शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी हे पाऊल उचलले. मागील 2 दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्य सयाजी राज हुंबे हे आमरण उपोषण करत आहेत. जिल्हा परिषदेत शाळेचा प्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. ईट येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण 1150 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
advertisement
तालुक्यातील सर्वात मोठं गाव -
ईट म्हणजे भूम तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावातील सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. कारण शाळेची गुणवत्ता दर्जेदार आहे. परंतु शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. वारंवार प्रशासनाच्या कानावर घालून देखील यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी आज अखेर शाळाच बंद पाडली.
advertisement
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
शाळेची संच मान्यता करावी, शाळेसाठी तत्काळ शिक्षक देण्यात यावेत, रिक्त पदे भरण्यात यावी, यासह अनेक मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून ईट येथील ग्रामस्थ सयाजीराजे हुंबे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळा बंद पाडली आणि शाळेला कुलूप लावले. तर सयाजीराजे हुंबे हे उपोषण करीत आहेत. त्यामुळे शाळेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, असे मत ग्रामस्थ आणि पालक यांच्याकडून करण्यात आले आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी घेतला हा निर्णय, आज अनेकांना होतेय मदत, धाराशिवमधील व्यक्तीचे कौतुकास्पद कार्य!
दरम्यान, याठिकाणी मोठी गर्दी जमलेली होती. गावकऱ्यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशासन नेमके काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 07, 2024 8:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप, धाराशिवमधील घटना, नेमकं काय घडलं?