Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा दणका, ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी :  मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात अंगरक्षकासह प्रवेश केल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती, त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे व कैलास पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या माध्यमातुन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले होते. त्यात मतमोजणी केंद्रात आमदार कैलास पाटील व उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे नियमाला डावलून अंगरक्षकासह वावर करताना दिसून आले.  त्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा दणका, ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement