ना माती ना POP, इथं 77 वर्षांपासून पूजतात चंदनाची मूर्ती! पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची अनोखी परंपरा

Last Updated:

गणपती मूर्ती उपलब्ध नसल्याने एका कॅलेंडर वरील फोटो घेऊन पहिल्यांदा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर लाकडी गणेशमूर्ती बनवण्यात आली.

+
धाराशिव 

धाराशिव 

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: सध्याच्या काळात गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. तर काहीजण पर्यावरणपुरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य देतात. परंतु, धाराशिवमधील मुरुम येथे गेल्या 77 वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची अनोखी परंपरा जोपासली आहे. इथं माती किंवा पीओपी नाही तर चक्क चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या एकाच गणेशमूर्तीची पूजा केली जाते.
advertisement
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे मध्यवर्ती अशोक चौक गणेश मंडळाची स्थापना 1947 झाली. त्यावेळी मराठवाडा हे निजाम सरकारच्या हैद्राबाद संस्थान मध्ये होते. हा परिसर स्वतंत्र भारतात आणखी विलीन झाला नव्हता. त्यामुळे याठिकाणी सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जात नव्हते. तेव्हा लोकांनी एकत्र येऊन एखादा सार्वजनिक कार्यक्रम सुरू करण्याची कल्पना पुढे आली आणि शहरातील त्याकाळी मुख्य बाजार पेठ असलेल्या अशोक चौक येथील व्यापारी बांधवांनी एकत्र येत गणेश मंडळाची स्थापना केली.
advertisement
चंदनाच्या लाकडाची गणेशमूर्ती
गणपती मूर्ती उपलब्ध नसल्याने एका कॅलेंडर वरील फोटो घेऊन पहिल्यांदा उत्सव साजरा करण्यात आला. नंतर शहरातील किसान चौक येथील किसान सुतार नामक कारागीर यांनी चंदनाच्या लाकडा पासून गणेशाची मूर्ती साकारली. गेल्या 77 वर्षांपासून आजतगायत गणेशोत्सवात हीच मूर्ती पूजली जाते. विशेष म्हणजे अखंड लाकडात कोरलेली ही मूर्ती असून यावर सुबक नक्षीकामही करण्यात आलंय.
advertisement
77 वर्षांपासून एकच गणेशमूर्ती
आमची मूर्ती ही पर्यावरण पूरक असून गेल्या 77 वर्षापासून एकच गणेश मूर्ती स्थापना करण्यात येते. दरवर्षी विविध सामाजिक , धार्मिक उपक्रमांनी गणेशोस्तव साजरा करण्यात येतो. तसे याहीवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम , ज्वालासुराचा वध या देखाव्यासह विविध कार्यक्रमांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे गणेश मंडळाचे अध्यक्ष राजकुमार वाले यांनी सांगितले
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
ना माती ना POP, इथं 77 वर्षांपासून पूजतात चंदनाची मूर्ती! पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची अनोखी परंपरा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement