Eye Tips : पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल, डॉक्टरांनी दिली तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
विशेष करून पावसाळ्यात डोळ्यांचे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. प्रियंका येळापुरे यांनी अधिक माहिती दिली.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा डोळ्यांचे साथीचे आजार पसरू शकतात. डोळ्यांचं आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आजही आपण पाहिलं की देशभरात अनेक लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
खरंतर डोळे हे आपल्या आत्म्याच्या खिडक्या आहेत आणि आपल्या दैनंदिन कामकाजासाठी डोळे अत्यंत आवश्यक आहेत. आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवायचे असेल तर आपण आपले डोळे निरोगी ठेवणे महत्त्वाचे असते. आपले डोळे निरोगी असतील तर आपण आयुष्य सुंदर करू शकतो. विशेष करून पावसाळ्यात डोळ्यांचे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. प्रियंका येळापुरे यांनी अधिक माहिती दिली.
advertisement
पावसाळ्यात विशेष करुन आपल्या कामाच्या ठिकाणी डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी, नियमित तपासणी शेड्यूल करणे, कामाच्या ठिकाणी योग्यरित्या फिट संरक्षण चष्मा घालणे आणि चष्माची योग्य देखभाल (स्क्रॅच-फ्री लेन्स आणि डोळ्यांच्या संरक्षणाची स्वच्छता राखणे) सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
advertisement
गणपतीची प्राणप्रतिष्ठा ते विसर्जनाची अत्यंत अनोखी पद्धत, तुम्ही पाहिली नसेल, मुंबईतील महिलेची कल्पना, VIDEO
पावसाळ्यात निरोगी डोळ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावेत, विशेषतः डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डोळे चोळणे टाळावे. इतरांना टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांचा मेकअप, इतरांचा मेकअप शेअर करू नका. अशाप्रकारे आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
सूचना - ही माहिती तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Eye Tips : पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल, डॉक्टरांनी दिली तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, VIDEO