advertisement

Maharashtra politics : 'त्या' लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मंत्र्याचा पुतण्या 3 हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला रवाना

Last Updated:

लोकसभेच्या काही जांगाबाबत अजूनही महायुतीमध्ये तिढा कायम आहे, त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. भाजपमधून नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवमध्ये लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आता धाराशिवमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं शिवसैनिक नाराज आहेत. धाराशिवमधील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत.
तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. वर्षा बंगल्यावर शिवसैनिकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान धाराशिवमध्ये शिवसैनिकांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध होत असल्यानं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. धाराशिवची जागा ही शिवसेनेच्या हक्काची जागा असल्यानं ती परत घ्यावी अशी भूमिका त्यानी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी नाराज शिवसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार आहेत. जागा परत न घेतल्यास पुढील निर्णय घेऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धाराशिवच्या जागेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra politics : 'त्या' लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मंत्र्याचा पुतण्या 3 हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला रवाना
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement