पाऊस पडताच जनावरांचा भाव वाढला! धाराशिवमधील गाईंच्या किमती पाहून डोळे विस्फारतील
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
जुलै महिन्यात हिरवा चारा आणि पाणी उपलब्ध झाला आहे. यामुळे आता जनावरांच्या किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे जनावरांसाठी चारा पुरेसा उपलब्ध नव्हता. तर बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे जनावरांच्या किमती आपोआप कमी झाल्या होत्या. तसेच जनावरांच्या बाजारात मंदीची लाट पसरली होती. जनावरांना पुरेशी मागणी नव्हती. अशा परिस्थितीत बाजारात मोठी घसरण झाली होती.
यानंतर आता जुलै महिन्यात हिरवा चारा आणि पाणी उपलब्ध झाला आहे. यामुळे आता जनावरांच्या किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात 20 लिटर दूध देणारी गाय ही 60 हजार रुपयांना ते 70 हजार रुपयांना मिळत होती. तर आता पाऊस पडल्यानंतर हीच गाय 95 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे जनावरांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.
advertisement
महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos
दरवर्षीच्या उन्हाळ्यात दुधांचे भाव वाढतात. यामुळे जनावरांचे भावही वाढतात. मात्र, यावर्षी उन्हाळ्यात दुधाचे भाव स्थिर राहिल्याने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचे बाजार भाव घसरलेले पाहायला मिळाले. पण पाऊस पडताच दुधाच्या बाजारभावात दोन-तीन रुपयांनी वाढ झाली आहे. यासोबतच जनावरांच्या किमतीत 20 ते 30 हजार रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
advertisement
जनावरांच्या बाजारात पाऊस पडल्यानंतर चारा उपलब्ध झाला आणि दुधाचे बाजार भाव वाढल्याने जनावरांच्या बाजार बाजारभावात वाढ झाली आहे. 20 लीटर दूध देणाऱ्या गाईची किंमत 1 लाख रुपयांवर गेली आहे, अशी माहिती जनावरांचे व्यापारी उमेश मोहिते यांनी दिली.
advertisement
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 22, 2024 6:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
पाऊस पडताच जनावरांचा भाव वाढला! धाराशिवमधील गाईंच्या किमती पाहून डोळे विस्फारतील