Dharashiv News : ब्लाउज वेळेवर शिवलं नाही म्हणून टेलरला ठोठावला हजारो रुपयांचा दंड, धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून धाराशिवमधील एका महिला टेलरला दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ब्लाउज मोफत शिवून देण्याची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून धाराशिवमधील एका महिला टेलरला तब्बल 15 हजार रुपयांचा दंड ठोटावण्यात आला आहे.  एवढंच नाही तर या टेलरला संबंधित महिलेचे ब्लाऊज मोफत शिवून देण्यास सांगण्यात आलं आहे. धाराशिवच्या ग्राहकमंचने या प्रकरणातील निकाल दिला आहे.
ॲडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाऊज शिऊन न दिल्याने धाराशिवच्या टेलर महिलेला तब्बल 15 हजार रुपयांचा दंड ग्राहक तक्रार निवारण मंचने ठोठावला आहे. तसेच राहिलेला ब्लाऊज मोफत शिवून देण्याची शिक्षाही सुनावली आहे. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. यासाठी एकूण 6 हजार 300 रुपये बिलापैकी 3 हजार रुपये ॲडव्हान्स दिले. नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही.फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळत नसल्याने 28 एप्रिल 2023 रोजी कस्तुरे यांनी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्यान मंचाने बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद न देता नेहा संत या सुनावणीला गैरहजर राहिल्याने 15 जुलै 2024 रोजी ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश पारित करीत नेहा संत यांना 10 हजार रुपये दंड तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला आहे. तसेच मोफत ब्लाउज शिवून देण्यास देखील सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : ब्लाउज वेळेवर शिवलं नाही म्हणून टेलरला ठोठावला हजारो रुपयांचा दंड, धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement