ladki bahin yojana : 3 हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा, धाराशिवमधील महिला झाल्या भावूक, काय म्हणाल्या?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा 3 हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदून गेल्या आहेत. या बहिणींनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भावांचे आभार मानले आहेत.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजारांचा हप्ता जमा झाल्याने बहिणींनी मुख्यमंत्री भावाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री भाऊरायाची लाडक्या बहिणींना ओवाळणी मानत महिलांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भावांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. हिंदू धर्म संस्कृतीनुसार बहिण भावाच्या नात्यांचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. याच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा 3 हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदून गेल्या आहेत. या बहिणींनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भावांचे आभार मानले आहेत.
advertisement
ladki bahin yojana : साताऱ्यात 2 दिवस आधीच लाभार्थींच्या खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात, महिलांनी दिली ही प्रतिक्रिया
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भांडगाव येथील सारिका अंधारे यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आनंदून गेलेल्या सारिका अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे तसेच आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहे.
advertisement
यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील अनिता पवार यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. यानंतर रक्षाबंधनाच्या अगोदरच भाऊरायाने ओवाळणी दिल्यामुळे त्यांनी भाऊरायाचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, रक्षाबंधनाला हप्ता जमा होईल अशी आशा होती. मात्र, रक्षाबंधनाच्या अगोदरच बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री भाऊरायाने दिलेल्या या ओवाळणीबद्दल भाऊरायाचे आभार मानले आहेत.
advertisement
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Aug 15, 2024 7:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
ladki bahin yojana : 3 हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा, धाराशिवमधील महिला झाल्या भावूक, काय म्हणाल्या?, VIDEO










