Dharashiv Success Story : अत्यल्प पाऊस, सिंचनाचीही सुविधा नाही, पण त्याने करुन दाखवलं, आज महिन्याला करतोय 60-70 हजारांची कमाई

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातील शेती म्हणजे दुष्काळाशी सामना करीत करावी लागणारी शेती. मोठी बाजारपेठ नाही. त्यात अत्यल्प पाऊस, शाश्वत सिंचनाचीही सुविधा नाही.

+
संभाजी

संभाजी नानासाहेब मोहिते

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : एकीकडे बेरोजगारीची अवस्था मोठ्या प्रमाणात वाढत असताना काही जर व्यवसायात आपले नशिब आजमावत आहेत आणि त्यात प्रचंड मेहनत करत यशस्वीही होत आहे. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जो व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई करत आहे.
संभाजी नानासाहेब मोहिते असे या तरुणाचे नाव आहे. तो धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील वालवड येथील रहिवासी आहे. त्याने दूध व्यवसायात चांगली प्रगती केली आहे. तसेच दुधासोबत दूध संकलन आणि पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून त्याला महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज
धाराशिव जिल्ह्यातील शेती म्हणजे दुष्काळाशी सामना करीत करावी लागणारी शेती. मोठी बाजारपेठ नाही. त्यात अत्यल्प पाऊस, शाश्वत सिंचनाचीही सुविधा नाही. त्यामुळे शेतीपेक्षा नोकरी केलेली बरी, या हेतूने संभाजी मोहिते या तरुणाने आठ वर्ष दुधाच्या कंपनीमध्ये नोकरी केली. त्यातून चार पैसे उभे केले आणि स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं या उदात्त हेतूने नोकरी सोडली.
advertisement
यानंतर सुरुवातीला 35 हजार रुपये किमतीची एक गाय विकत घेतली आणि दूध व्यवसाय सुरू केला. पण नंतर एका गायीच्या दोन, दोनाच्या चार आणि चारच्या आठ गायी केल्या. गाईच्या दुधाच्या उत्पन्नातून शेतीला हातभार मिळू लागला. शेतीचे उत्पन्न वाढले आणि आलेल्या पैशातून त्याने घर बांधले. तसेच शेतीत अत्याधुनिक बदल केला.
सध्या त्याच्याकडे 8 गायी आहेत. त्यातून 70 ते 75 लिटर दुधाचे उत्पन्न मिळते. तसेच त्याने स्वतःचे ज्ञानेश्वरी दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात 400 ते साडेचारशे लिटर दूध दररोज संकलित होत्या. दूध संकलन केंद्रासोबतच पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे दोन्ही व्यवसायातून महिन्यासाठी 60 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
advertisement
चित्रकलेची आवड -
संघर्षाच्या काळातही त्याने चित्रकलेची कला जोपासली. आतापर्यंत त्याने 40 ते 50 स्केच तयार केले आहेत. तो अप्रतिम असे चित्र तयार करतो. आई, वडील, बहिणी आणि पत्नी या सर्वांच्या साथीने संभाजी या 29 वर्षांच्या तरुणाने संघर्ष करत जीवनात अमूलाग्र बदल घडवला. त्यांचा हा प्रवास हा निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv Success Story : अत्यल्प पाऊस, सिंचनाचीही सुविधा नाही, पण त्याने करुन दाखवलं, आज महिन्याला करतोय 60-70 हजारांची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement