गावाकडे येताना कारला अचानक आग, स्टेरिंगवर बसलेले चंद्रकांत आगीत जळून खाक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावालगत असलेल्या रस्त्यावर कडेला कार आगीत जळालेल्या स्थितीत आढळून आली.
दिपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका मारुती कारला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत चालक जळून खाक झाले. त्यांचा केवळ सांगाडा उरला. खरंच आग लागली की घातपात होता, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावालगत असलेल्या रस्त्यावर कडेला कार आगीत जळालेल्या स्थितीत आढळून आली. चंद्रकांत धिवरे असं कार सोबत आगीत जळून मृत्यू पावलेल्या कारचालकाचं नाव असून ते सुरत येथे वास्तव्याला होते.
दुर्घटना नेमकी कशी घडली? पोलिसांकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही
घटनेत कारचालक चंद्रकांत धिवरे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान कारला आग लागून झालेली ही दुर्घटना नेमकी कशी झाली याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
advertisement
गाडीत फक्त सांगाडा उरला
दरम्यान, चंद्रकात धिवरे हे खामखेडा येथे त्यांच्या मूळ गावी कारने येत असताना त्यांच्या कारला आग लागली. या दुर्घटनेत स्टेरिंगवर बसलेले चंद्रकांत धिवरे हे देखील संपूर्ण जळून खाक झाले असून गाडीत फक्त सांगाडा उरला आहे. त्यामुळे कारलाही आग लागली की घातपात आहे? याचा पोलीस तपास करीत आहेत.
view commentsLocation :
Dhule,Maharashtra
First Published :
December 17, 2025 3:44 PM IST










