Diva-Sawantwadi Trains: दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल, कोणत्या स्थानकावर किती वाजता पोहोचणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Diva-Sawantwadi Express: दिवा- सावंतवाडी रोड- दिवा एक्सप्रेसच्या (दररोज) वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला.
कोकण रेल्वे: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकणात गावी जाण्यासाठी प्रवाशांसाठी सोयीची असणारी दिवा- सावंतवाडी- दिवा या एक्सप्रेसच्या वेळापत्रक संदर्भात एक बातमी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रत्येक सीझन दरम्यान, या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात येतो. त्याचप्रमाणे आता सुद्धा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेने आता प्रवाशांच्या सोयीप्रमाणे एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे आता दिवा- सावंतवाडी रोड- दिवा एक्सप्रेसच्या (दररोज) वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार, दिवा- सावंतवाडी रोड- दिवा एक्सप्रेस आता खूपच लवकर दिवा स्थानकावरून सुटणार आहे. नियमित वेळेच्या 10 ते 15 मिनिट आधी ही एक्सप्रेस सुटणार आहे. 10105 डाऊन दिवा- सावंतवाडी रोड एक्सप्रेस दररोज दिवा स्थानकावरून सकाळी 06:25 मिनिटांनी सुटते. पण आता नव्या वेळापत्रकानुसार ही एक्सप्रेस सकाळी 6 किंवा 6:15च्या दरम्यान दिवा स्थानकावरून सुटेल. त्यामुळे प्रवाशांना आता वेळेच्या आधीच दिवा रेल्वे स्टेशन गाठावे लागणार आहे. हे सुधारित वेळापत्रक 12 जानेवारी 2026 पासून एक्सप्रेससाठी लागू होईल. त्या प्रमाणेच प्रवाशांनी वेळापत्रक पाहून गावी जाण्यासाठी निघायचं आहे.
advertisement
दरम्यान, दिवा ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस दररोज रोहा स्थानकावर सकाळी 09:00 ते 09:05 या वेळेत पोहोचत होती. पण आता सुधारित वेळापत्रकानुसार हिच एक्सप्रेस रोहा स्थानकावर सकाळी 08:50 ते 08:55 या वेळेत थांबणार आहे. त्यामुळे सकाळच्या प्रवासात वेळेची बचत होऊन प्रवाशांना पुढील प्रवास अधिक सुकर होणार आहे. 10106 अप सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन एक्सप्रेस ही सध्या सायंकाळी 05:20 ते 05:25 या वेळेत धावत होती. नव्या वेळापत्रकानुसार ही एक्सप्रेस आता 05:05 ते 05:10 या वेळेत पोहोचणार आहे. संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान, या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diva-Sawantwadi Trains: दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल, कोणत्या स्थानकावर किती वाजता पोहोचणार?









