Mumbai Bhuleshwar Market: भुलेश्वर मार्केटमध्ये दिवाळीची धामधूम! रांगोळी आणि सजावटीचे साहित्य फक्त 15 रूपयांत

Last Updated:

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली असून शहरभरात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या भुलेश्वर मार्केटमध्येही होलसेल दरात दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी मोठी गर्दी दिसत आहे.

+
भुलेश्वर

भुलेश्वर मार्केटमध्ये दिवाळीची धामधूम! शुभ-लाभ, रांगोळी आणि सजावटीचे साहित्य फक्

मुंबई: दिवाळी अगदी काही दिवसांवर आली असून शहरभरात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या भुलेश्वर मार्केटमध्येही होलसेल दरात दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी मोठी गर्दी दिसत आहे. पारंपरिक सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, शुभ लाभ स्टिकर्स, रांगोळी, पणत्या आणि सजावटीचे साहित्य, इथे फक्त 15 रूपयांपासून उपलब्ध आहेत.
भोईवाडा १ मधील सुमन इंटरप्रायजेस या दुकानात तुम्हाला रांगोळीचे वेगवेगळे प्रकार मिळतील. फक्त 15 रूपयांमध्ये कमळ, लक्ष्मीचे पावले आणि इतर डिझाईनचे रांगोळी छापे मिळतात. तसेच रेडीमेड रांगोळी जी दोन्ही बाजूंनी वापरता येते ती फक्त 17 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. एका पाकिटात तब्बल दहा डिझाईन्स असणार आहेत. याशिवाय, चिकटवायची रेडीमेड रांगोळी फक्त 70 रूपयांचे प्रति पीस आहे, तर मोठ्या प्रमाणात घेतल्यास ती फक्त 50 रूपयांमध्ये मिळते (एका पॅकेटमध्ये 10 पीस).
advertisement
दिव्यांच्या आजूबाजूला लावायची नक्षीकाम असलेली रांगोळीची जोडी फक्त 40 रूपयांना मिळते. नवीन ट्रेंडिंग डायमंड स्टिकर रांगोळी 180 रूपयांमध्ये उपलब्ध असून त्यात 10 डिझाईन्सचा पॅक आहे. शुभ लाभचे स्टिकर 40 रूपयांपासून, तर रांगोळीचे कलर असलेले सहा डबे फक्त 120 रूपयांमध्ये मिळतात. तसेच स्वस्तिक आणि लक्ष्मी पावलांचे चार पीस फक्त 30 रूपयांमध्ये मिळतात. सुमन इंटरप्रायजेसमध्ये सध्या 30 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत. भुलेश्वर परिसरात अशा अनेक ठिकाणी आणि स्टॉल्सवर तुम्हाला दिवाळीसाठी लागणारे साहित्य या परवडणाऱ्या दरात मिळू शकते. त्यामुळे या सणासुदीच्या काळात भुलेश्वर मार्केट हे खरेदीसाठी नक्कीच एक आकर्षक ठिकाण ठरले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Bhuleshwar Market: भुलेश्वर मार्केटमध्ये दिवाळीची धामधूम! रांगोळी आणि सजावटीचे साहित्य फक्त 15 रूपयांत
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement